धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 गट व पंचायत समितीच्या 110 गण यासाठी शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून, जिल्ह्यात 1589 कंट्रोल युनिट व 3600 बॅलेट युनिट 1308 मतदान केंद्रावर पोहोच केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणूकीची पूर्ण तयारी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

धाराशिव 274 मतदान केंद्र, तुळजापूर 230 मतदान केंद्र, उमरगा 196 मतदान केंद्र, लोहारा 100 मतदान केंद्र, कळंब 181 मतदान केंद्र, वाशी 73 मतदान केंद्र, भूम 124 मतदान केंद्र, परंडा 130 मतदान केंद्र या प्रमाणे जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्राची संख्या 1308 आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 15 टक्के राखीव सह केंद्राध्यक्ष म्हणून 1505 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदान अधिकारी 1, 2, 3 प्रत्येकी 1505 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात निवडणुका शांततेत होण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी संपेपर्यंत 163 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान मशीन यंत्रासह पोहोचण्यासाठी निवडणूक विभागाने धाराशिव एसटी विभागाला 158 बसेस उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत. या बसेसना जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. 

 
Top