धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील नामदेव अंबादास वाघमारे यांचे रविवार, 25 जानेवारी रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शहरातील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. ते शहरातील प्रसिध्द चर्मकार होते. मागील 50 वर्षांपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांचा चप्पल, बुट तयार करणे व विक्रीचा व्यवसाय आहे.

 
Top