धाराशिव ( प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. आरती माळी यांना पीएच. डी. प्रदान झाली आहे. त्यांनी "कोव्हिड पॅण्डमिक दरम्यान मराठवाड्यातील शासकीय हॉस्पिटल मधील नर्सेस यांचा वर्क लाईफ बॅलन्स" यावरती प्रबंध सादर केला होता. मस्सा (खं), ता.कळंब येथील असलेल्या डॉ. आरती यांनी कोव्हिड आणि महिला नर्सिंग स्टाफ या वरती लक्षकेंद्रित करून केलेला अभ्यास मार्गदर्शक असेल. सदर संशोधना साठी त्यांना व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांच्या या यशासाठी त्यांचे अभिनंदन डॉ. अर्शद रजवी, डॉ. विक्रम शिंदे, प्रा, सचिन बस्सैये आणि प्रा. वरुण कळसे, माळी कुटुंब आणि मित्र परिवार यांनी केले.

 
Top