धाराशिव (प्रतिनिधी)- शहर पोलीस ठाणे धाराशिव येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलिस विभागातील शस्त्राची माहिती प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात शस्त्र व सायबर गुन्हे,महिला व बालकांचे विरुद्ध गुन्हेगारी व इतर माहिती देण्यात आली आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

शस्त्र माहिती सत्रकारिता पोलीस निरीक्षक कुमार दराडे, सहा.पोलीस निरीक्षक अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक ओहोळ, पोलीस उपनिरीक्षक अक्षय दिघोळे, पोलीस अंमलदार शिवाजी अनंतवाड, कनामे, रिजवान बेग, महिला पोलीस अंमलदार चव्हाण व होमगार्ड उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी मार्गदर्शन केले व शस्त्र बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक अक्षय डिघोळे यांनी दिली. शस्त्र सत्र प्रदर्शनात 65 महिला विद्यार्थी, 60 पुरुष विद्यार्थी, 01 महिला शिक्षिका, 02 महिला वॉर्डन, 02 पुरुष शिक्षक यांनी सहभाग नोंदवुन पोलीस विभागातील शस्त्राची माहिती घेतली. प्रदर्शनात सहभागी झाल्या बद्दल पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी आभार मानले.


 
Top