धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले: शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथील इतिहास विभागाचे प्रा. डॉ. अनिल कुंभार, आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय इंदापूर येथील इतिहास विभागाचे प्रा. डॉ. सुरेंद्र शिरसाट, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. विष्णू वाघमारे हे लाभले होते.
सदर मान्यवरांनी सावित्रीबाई फुले आणि त्यांचे शिक्षण क्षेत्रातले योगदान, महिला सबलीकरण, सामाजिक न्याय, अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. छाया दापके या होत्या. प्रस्ताविक प्रा. डॉ. विकास सरनाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माधव उगिले यांनी केले. तर आभार प्रा. नील नागभिडे यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
