भुम (प्रतिनिधी)-  भूम आगारात चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाच्या मुलाचे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणून निवड झाल्याने भूम आगारातील कर्मचाऱ्याकडून आज पालकासह यशस्वी मुलाचा सत्कार करण्यात आला. 

भूम आगारात चालत म्हणून काम करणाऱ्या तालुक्यातील वांगी येथील अशोक पवार यांच्या मुलाची आज इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणून निवड झाल्याने आज भूम आगारात आगारप्रमुख उल्हास शिनगारे यांच्या उपस्थितीत चालक अशोक पवार व त्यांचा मुलगा महेश याचा आगारातील एसटी बस समोर आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. चालक पवार यांचा मुलगा महेश हा येथील सचिन गोयकर यांच्या कर्मवीर अकॅडमी मध्ये गेल्या तीन वर्षापासून अभ्यास करत असून तो यावर्षी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये भरती झालेला आहे. त्याच्या यशाबद्दल आगारातील स्थानक प्रमुख श्रीकांत सुरवसे. टी. आय. गायकवाड,  वाहन परीक्षक अब्दुल शेख, विशाल काळे, भारत साठे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. आगारातील कर्मचाऱ्यांचे मुलं किंवा मुली कुठल्याही स्पर्धेत किंवा परीक्षेत पास झाल्यानंतर त्याचा आगारातर्फे सत्कार करण्याचा उपक्रम येथील आगारप्रमुख उल्हास शिनगारे यांनी चालू केल्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top