मुरुम (प्रतिनिधी) - कै. माधवराव (काका) पाटील ज्या उद्देशाने शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. त्यांचे स्वप्न होते की, संस्थेत चांगली माणसे आली पाहिजेत. त्यामुळे नगर शिक्षण विकास मंडळ या संस्थेत जे कर्मचारी नियुक्त केले गेले ते गुणवत्ताधारक होते आणि आहेत. चांगली माणसे निर्माण होणे ही संस्थेची परंपरा असून ज्या कर्मचाऱ्यांनी संस्थेत राहून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळेच संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात नाव होत आहे. संस्था म्हणजे एक परिवार असून प्रत्येक कर्मचारी हा संस्था व पाटील परिवाराशी एकरुप असून आमचे नाते अतूट बनले आहे. सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांचे नाते आपुलकी आणि स्नेहाचे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजप लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील यांनी प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे व प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांचा गुरुवारी (ता. 1) रोजी नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम च्या वतीने माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संस्थेच्या वतीने सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बसवराज पाटील व बापूराव पाटील यांच्या हस्ते सपाटे व बनसोडे यांचा संपूर्ण आहेर उपचार करून सपत्नीक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, संस्थेचे संचालक राजू भोसगे, प्राचार्य डॉ. सादक वली, प्राचार्य उल्हास घुरघुरे, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर, दत्तप्रसाद शेळके, कांत हुलसुरे, काशिनाथ मिरगाळे, बाबुराव जाधव, देवेंद्र कंटेकुरे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, सौ. उषा सपाटे, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, सौ. वैशाली बनसोडे, मुख्याध्यापक इरफान मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.                                  

अध्यक्षीय समारोपप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, या संस्थेत प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केल्यानेच आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये नावारुपाला येत आहेत. सत्काराला उत्तर देताना सपाटे म्हणाले की, जे अनुभव मला या संस्थेत काम करताना आले त्यांचा लेखाजोखा मांडून सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. डॉ. बनसोडे म्हणाले की, संस्थेच्या प्रती आम्ही कायम ऋणात राहून पुढच्या काळात देखील संस्थेशी एकरूप राहू. यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  परिश्रम घेतले.डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. विविध शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, सहकारी मित्र, नातेवाईक, मुरूम शहरातील पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला. 

 
Top