धाराशिव (प्रतिनिधी)- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालवणारे,पुरोगामी भूमिका ठामपणे घेणारे राज्याचे एक तडफदार व्यक्तीमत्व म्हणून अजित दादा यांची ओळख होती.प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने त्यांची प्रशासनावर मजबूत पकड असायची. सामान्य जनतेसाठी भल्या सकाळी उठून कामाला सुरवात करणार नेतृत्व आज तशाच सकाळी हरवलं हे मनाला चटका लावणार आहे. एक अनुभव संपन्न नेता राज्याने गमावल्याने मोठी हानी झाली आहे. धाराशिवचे जावाई असलेल्या नेत्यांस माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करतो.


 
Top