तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे दि.12 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत “ आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञान हे ब्रीद वाक्य घेऊन विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी डॉ मच्छिंद्र नागरे, सुप्रसिद्ध मराठी लेखक, श्री उत्तरेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय केम यांनी वरील प्रतिपादन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, बेळगावच्या पाटलांची कन्या ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्था माता सुशीलादेवी साळुंखे हा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा होता. मुळातच स्त्रीयांना कमी अधिकार त्या काळी असत. पण शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुरोगामी विचारांच्या आधारावर सुशीलादेवी साळुंखे यांनी बापूजींना खंबीर साथ दिली आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नावाचा मोठा परिवार त्यांनी दोघांनी मिळून निर्माण केला. दोघांचा संसार म्हणजे महाराष्ट्रातील बहुजन समाज होता. गरीब, होतकरू लेकरांना आईच्या मायेने शिकवुन मोठे करायचे हे आव्हान मोठ्या शिताफीने त्यांनी स्विकारले. आईच मुलांना मूल्यांची शिक्षण देत असते, म्हणून त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर जास्त भर दिला. कारण शिक्षण देऊन समाज शिक्षित होईल पण मूल्यांची जोपासना नाही केली तर शिक्षणाची फसगत होईल. या जाणिवेतून त्यांनी आपल्या जीवनातील सर्वोच्च कार्य केल्याचे डॉ नागरे यांनी सांगितले.
यावेळी प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांनीही संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवन चरीत्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जे.बी क्षीरसागर यांनी केले. सदर प्रसंगी विवेकानंद सप्ताहाचे संयोजक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ मंत्री आर. आडे, डॉ बापू पवार, डॉ. नेताजी काळे, बालाजी कऱ्हाडे, प्रा.स्वाती बैनवाड, प्रा.बाळू कुकडे, प्रा.निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव,डॉ.एफ एम तांबोळी,प्रा.राणू कोरे, प्रा अनिल नवात्रे,प्रा.सतीश वागदकर प्रा.क्रांती कदम यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी जगताप यांनी केले. तर आभार डॉ. शिवकन्या निपाणीकर यांनी मानले.
