कळंब (प्रतिनिधी)-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय , कळंब आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व 30 डिसेंबर रोजी दोन दिवशीय कार्यशाळा संस्थेचे सचिव, डॉ .अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित मार्गदर्शक डॉ.सुधाकर शेंडगे संचालक व विभाग प्रमुख आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग याप्रसंगी म्हणाले , वर्गाच्या बाहेर असणाऱ्या माणसांनी इतिहास घडवलेला आहे .ज्यांनी मानवतेचे, संस्कृतीचे संचित समोर आणले .माणुसकीचे वलय येण्यासाठी मानवतेच्या संचिताची परंपरा जोपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यशाळेच्या समारोप समारंभाची सुरुवात कै.मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने झाली .याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ.अनंतराव शिंदे लातूर यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय काळाची गरज या विषयावर सखोल विचार मांडले .ते म्हणाले ,दूध हा अन्नसाखळीतील एक अविभाज्य घटक असून गरजेनुसार पुरवठा होण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे .भारताचा दुग्ध उत्पादनात पहिला क्रमांक असून दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वाढत आहेत त्यामुळे दुग्ध व्यवसाय काळाची गरज असल्याचे नमूद केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान तर सिनेट सदस्य डॉ. संजय कांबळे, संचालक वसंतराव मडके, उपप्राचार्य कमलाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचा वृत्तांत कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ .दादाराव गुंडरे यांनी सादर केला. या कार्यशाळेच्या उपक्रमाबद्दल संचालकांनी अभिनंदन केले. कार्यशाळेच्या समारोपाचे सूत्रसंचालन डॉ .सर वदे वर्षा  तर आभार डॉ. मीनाक्षी जाधव यांनी मानले. यावेळी प्रा .अर्चना मुखेडकर, प्रा .डॉ .दीपक सूर्यवंशी, डॉ. ज्ञानेश चिंते, डॉ जयवंत ढोले,डॉ. श्रीकांत भोसले,प्रा .शाहरुख शेख, प्रा .समाधान चंदनशिवे, प्रा .मारुती शिंपले, प्रा. लोहकरे, प्रा.प्रणिता खोसे, प्रा. घाटपारडे मॅडम तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक श्री हनुमंत जाधव ,डॉ.बालाजी वाघमारे ,प्रा. राम दळवी, संतोष मोरे,कमलाकर बंडगर, उमेश साळुंखे ,आदित्य मडके यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

 
Top