परंडा  ( प्रतिनिधी) - स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, प्रतिभासंपन्न कवयित्री, समाजसुधारणेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून संपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.. 

यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. झहीर चौधरी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंहभैय्या ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, अरुण करळे, गजानन तिवारी, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, योगेश डांगे, अभिजित चोबे, अकिब पठाण, सोहम परदेशी, सायम शेख, महिला शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top