मुरुम ( प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिवस व किशोरी मेळावा जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरुम  येथे उत्साहात साजरा करण्यात आला.स्त्री शिक्षणाची द्वारे ज्या माऊलीने सर्व स्त्री जातीसाठी खुली केली, स्त्रीयांच्या उन्नतीसाठी, समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य  खर्च केले, अशा माऊलीची जयंती शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चाँदपाशा गवंडी व सदस्य कटके ताई हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचे  पूजन केले. विविध भारतीय समाजसेविका स्त्री वेशभूषेमध्ये विद्यार्थिनींनी स्त्री शक्तीचा जागर केला . अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा महिमा सांगितला. शाळेतील शिक्षिका श्रीमती संगित डोकडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकला . तर श्री.शिवाजी कवाळे यांनी किशोर वयीन मुलींना आहार आरोग्य व सामाजिक जबाबदारी व खबरदारी इत्यादी विषयी उद्बोधन केले. इ . 5 वी ची विद्यार्थिनी कुमारी श्वेता ढाले हिने मी सावित्री बोलते हे एक पात्री नाटक सादर केले. इयत्ता दहावीच्या मुलींनी सावित्रीमाई फुले यांच्यावर ओवी सादर केली. इयत्ता आठवीतील तनसिरा नदाफ हिने फातिमा शेख यांच्या विषयी माहिती सांगितली. आलिया  उडचणे व अल्फला नदाफ या विद्यार्थिनींनी मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी मांडल्या. प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपाशा गवंडी यांनी बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजयकुमार देशमाने  यांनी आपले अध्यक्षीय समारोपात मुलींनी शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणीवर मात करून शिक्षणासाठी भक्कमपणे उभे राहावे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून आपले आयुष्य किर्तीमान घडवावे,असे प्रतिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी स्वामी हिने केले तर आभार  कु.पूजा कुंभार हीने मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक संतोष कडगंचे,विलास कंटेकुरे,मोहन राठोड,गणपत पाटील,राजू पवार, नागनाथ कामशेट्टी,निर्मला परीट इत्यादींनी परिश्रम घेतले.


 
Top