धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्यजगीत, महाराष्ट्र गीत व इतर देशभक्तीपर गीत संगीत शिक्षक महेश पाटील व बालचमूनी सादर केले.
एन.एन.सी तसेच स्कॉऊड गाईड या दोन्ही संघाने राष्ट्रध्यज व मान्यवरांना सलामी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ए.व्ही. शेंडगे, सुहास शेवाळे होते. त्यानंतर आयएमओ व एनएसओ या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा व समन्वयक म्हणून काम पाहणारे गणित विभाग प्रमुख धनंजय वीर व विज्ञान विभाग प्रमुख संतोष देशमुख व क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या प्रशालेतील खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक अभिजित पाटील, लोमटे सर यांचा सत्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सुधीर पाटील, संस्था सदस्य पी.एल. गाडे, संतोष कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक अरूण बोबडे, वाय.के.पठाण, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, बी.एम. गोरे, प्रा. विनोद आंबेवाडीकर, मोहनराव शिंदे, कैलास कोरके, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक सुनील कोरडे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे छायाचित्रण सूरज सपाटे, शेषनाथ वाघ, शिवाजी भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील व एस.के.आघाव यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.
