उमरगा (प्रतिनिधी)- महायुती व महाविकास आघाडीतील बैठका नंतरही कांही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी 90 इच्छुकापैकी 59 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 31 उमेदवार राहिले आहेत. तर पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 जणापैकी 112 जणांनी माघार घेतल्याने 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 जागेसाठी एकुण 90 इच्छुकानी अर्ज दाखल केले होते. यापैकी 59 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर निवडणूक रिंगणात 31 उमेदवार राहिले आहेत. पंचायत समितीच्या 18 जागेसाठी 165 जणांचे अर्ज मंजूर झाले होते. यापैकी 112 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सिंग सुट्टया आणि अर्ज मागे घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची विनवण्या सुरू होत्या. सकाळपासून अर्ज मागे घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.


 
Top