धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त समता गृहनिर्माण सोसायटी धाराशिव येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सहारा वृद्धाश्रम येथे वृद्धांना फळे वाटप करण्यात आली.

समता गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन नानासाहेब घाडगे, सदस्य वासुदेव वेदपाठक  यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष विभीषण खुणे, भूम तालुकाध्यक्ष संतोष डोरले, धाराशिव तालुकाध्यक्ष व्यंकट जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मनोज वाघमारे, अनुदेव मारकड, भजनदास जगताप, रुपेश बनसोडे, अभिजीत नलावडे यांच्यासह बहुसंख्य समता सैनिक उपस्थित होते. यावेळी समता परिषदेच्या संघटन बांधणीसाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 1 नोव्हेंबर 1992 रोजी  महात्मा  जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. या घटनेला 33 वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सहारा वृद्धाश्रम येथे फळे वाटप करण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक राहुल भड, संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत यांच्यासह इतर पदाधिकारी, वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळी उपस्थित होते.

 
Top