तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शुगर प्रा. लि. येथे पहिल्या गळीत हंगामाचा मोळी पूजन सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात शनिवार 1 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. ऊस गाळपाच्या शुभारंभी कारखाना परिसरात शेतकरी, कामगार आणि मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याचे पूजन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट आणि ॲड. अनिल काळे, चेअरमन, तुळजापूर शुगर प्रा. लि. यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक आदित्य काळे, संचालक ऋषिकेश वडगांवकर  अधिकारी, कर्मचारी, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना ॲड. अनिल काळे म्हणाले, की तुळजापूर शुगर प्रा. लि. हा केवळ एक कारखाना नसून, शेतकऱ्यांचा आणि स्थानिक जनतेचा विकासाचा एक केंद्रबिंदू आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांना ऊसासाठी हमीभाव आणि वेळेवर पैसे मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

विनोद गपाट यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.शुभारंभ प्रसंगी धार्मिक विधी, मोळी पूजन आणि पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली. परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तुळजापूर शुगर प्रा. लि. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे, अशी माहिती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी सभासद, शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top