धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे डॉ आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तर कमान उभारण्यात यावी. तसेच कसबे तडवळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.28 ऑक्टोबरपासून दोन दिवशीय उपोषण सुरू करण्यात आले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू, प्राचार्य, शिक्षक आणि भीम आर्मी भारत इयत्ता मिशन यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये बैठक लावण्यात यावी. तसेच कसबे तडवळा येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, या मागण्यांसाठी भीम आर्मीच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रणजीत बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गायकवाड, आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर बनसोडे, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कांबळे, कळम तालुका उपाध्यक्ष धनराज नाईकवाडे, सल्लागार सुरेश कांबळे, मुकेश मोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, धाराशिव शहराध्यक्ष विश्वा पेठे, उपाध्यक्ष फयाज पठाण, जिल्हा सचिव लखन ओव्हाळ आदी सहभागी झाले आहेत.
 
