धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्ष धाराशिव तर्फे आ.राणा जगजितसींह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि आयोजक शहराध्यक्ष अमीत शिंदे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट शिस्तप्रिय गणेशोत्सव सादरीकरण व मिरवणुक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक रु ५१०००/- द्वितीय पारितोषिक रु ३१०००)- तृतीय पारितोषिक रु २१०००/- ठेवण्यात आले असून तीन मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रु ५०००/- देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती रक्षणाचे व समाजात ऐक्य व भक्तीभाव वृद्धिंगत  करण्याचे महत्वपूर्ण कार्य होत असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्पर्धा संयोजक तथा भाजपा शहराध्यक्ष अमीत शिंदे यांनी कळविले आहे.

 
Top