धाराशिव (प्रतिनिधी)- मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या ,गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या श्रीच्या पूजा विधीसाठी जिल्हाधिकारी कीर्ती  पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान मैनाक घोष यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी पूजाविधी मंत्र उच्चार व शास्त्रोक्त पद्धती ने भक्तीमय वातावरण , काशिनाथ दिवटे यांच्या मंजुळ आवाजात, विविध देवतांची आरती म्हणून घंटा नाद व विविध वाद्यांचा वादन व समूहाने  म्हणली जाण्यामुळे प्रभागात दम दमून गेले होते जिल्हाधिकारी पुजार यांचा मंडळाच्या वतीने सन्मान प्रा गजानन गवळी व मनमत पाळणे यांच्या शुभहस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी घोष यांचा सन्मान व सत्कार काशिनाथ दिवटे व डॉ. नायगावकर यांच्या शुभहस्ते शेला सन्मानाचिन्ह, मंडळाच्या श्री ची प्रतिमा देऊन करण्यात आली .

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत गौरव पूर्ण व उज्वल कार्य करणाऱ्या गुणवंताचा सन्मान करण्यात आला .

उस्मानाबाद जनता बँक राज्यांमध्ये तीन बँक पुरस्कार बँकेला सर्वोत्कृष्ट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून मिळालेल्या पारितोषकांबद्दल  वसंतराव नागदे चेअरमन  यांचा सन्मान . तामलवाडी येथील शिवरत्न मंडळाचे व शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी रायगडावरून शिवज्योतीचे आणणे पाचशे किलोमीटर अंतर चालत व पळत पंचवीस वर्षापासून अखंड परंपरा जपणारे सर्जेराव गायकवाड ,बापू राजे भोसले यांचा सन्मान , जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्षॲड अमोल वरुडकर व ऍड अनिकेत देशमुख नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान  मुकुंद घुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले,  उत्तम राऊत खो खो व ॲथलेटिक्स 100 मीटर धावणे एक ज्येष्ठ खेळाडू .  लखन देशमुख ही शिवशाही प्रतिष्ठान छत्रपती संभाजी महाराजाची जयंती मिरवणूक खर्च टाळून ,महिला सक्षमीकरण व  सबलीकरण व्हावे या उद्देशाने दहा गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करणारे . देवणी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले सोमनाथ माळी व कौशल्य विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गुरव इत्यादींचा सन्मान जिल्हाधिकारी  पुजार व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  घोष यांच्या शुभहस्ते करण्यात आला .यावेळी या सत्काराला उत्तर या सनमानार्थीने आम्ही अंधारात चाचपडत असलेली माणसं, आम्हाला या मंडळांनी उजेडात आणले व आमच्या कार्याला महत्त्व दिले हे आमच्या दृष्टीने भाग्य आम्ही समजतो मंडळाचा गेली 61 वर्षाच्या अखंडपणे कार्य करण्यामुळे आपणही पुढे  हीतरी कार्य करायला हवे असे विचार मांडले .

श्री घोष यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या दहा दिवसाच्या या कालावधीतील विविध उपक्रम पाहून असे मंडळ मला इतर कुठे दिसले नाही एक सामाजिक सेवा या माध्यमातून करीत असलेली ही ज्येष्ठ व बालक यांचा मला अभिमान  वाटतो व आनंद वाटतो तो सर्वांनी अनुकरणीय आहे असे उद्गार काढले

 जिल्हाधिकारी पूजार आपल्या प्रतिक्रिया देत असताना व हरित धाराशिव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होणे हे आपल्यासारख्या संस्थेच्या माध्यमातून घडू शकते. आपले मंडळ या धाराशिव जिल्ह्यातील जुने मंडळ आहे मंडळाचे नाव बाल हनुमान पण ते बाळ आता राहिले नाहीत जेष्ठ झालेत ही यातून कार्यातून दिसून आले मंडळ 61 वर्ष अखंडपणे काम करतो ते समाजसेवा, विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव, वंचित, दुर्बल, दुर्लक्षित घटकांना पूजेचे स्थान देऊन गणेश उत्सव जो केला जातो तो याच उद्दिष्टावर अवलंबून आहे. श्रीच्या पूजा विधी वेळी विविध धर्माचे ग्रंथ ही पूजा केली जाते सर्वधर्मसमभावाची भावना या ठिकाणी जोपासली जात आहे . मला अभिमानास्पद वाटते आपण सीमेवरील जवानांना राख्या पाठवून प्रेरणा देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये निधी किल्ले संवर्धनासाठी देत आहात,ऑपरेशन सिंदूर ,छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कीची  मानांकन, मराठी भाषेला अभिजात दर्जा, गणेश उत्सवास राज्य महोत्सव दर्जा इत्यादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मंडळ कार्यकर्ते कार्य करीत आहे या कार्यास माझ्या शुभेच्छा व अभिवादन असे गौरव उद्गार  सत्काराच्या वेळी काढले. या  कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र हुच्चे यांनी केले व आभार राजकुमार दिवटे यांनी मानले शोभेची दारू व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो , हर हर महादेव अशा विविध घोषणाने समारोप करण्यात आला. 


 
Top