धाराशिव ( प्रतिनीधी)- नवरात्र महोत्सवानिमित्त धाराशिव येथे भव्य दुर्गा दांडिया महोत्सवाचे दि. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या वतीने महिला व मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्याची संधी असून सहभागी स्पर्धकांना देखील भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत महिला, मुलींनी नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक आकाश कोकाटे यांनी केले आहे.
धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या दांडिया महोत्सवाचे अभिनेत्री शिवानी कांबळे व आयली घीया हे खास आकर्षण आहेत. स्पर्धेत ग्रुप डान्ससाठी प्रथम पारितोषिक 21 हजार रूपये, द्वितीय 15 हजार आणि तृतीय 7 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तर युगल डान्ससाठी प्रथम 5001, द्वितीय 3001 आण तृतीय 1001 रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सहभागी होणार्या महिला वर्गातून एका महिलेस लकी ड्रॉद्वारे पैठणी जिंकण्याची संधी असून प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याकरिता आयोजकांकडून कुपन घेणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क एक हजार रूपये ठेवण्यात आलेले आहे. ही स्पर्धा केवळ महिला व मुलींसाठी असून मर्यादित नावनोंदणी आहे. त्यामुळे इच्छुक महिला व मुलींनी तात्काळ नोंदणी करावी. नोंदणीसाठी 9503990766 व 9518994603 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजक तथा शिवसेना शहरप्रमुख आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी कळविले आहे.