तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीच्या वाहत्या पाण्यात महीलेचा पाय घसरून पडली.त्या महीलेला तेर येथील दोन युवकानी जीव धोक्यात घालून वाचविले.ही घटना 14 सप्टेंबरला दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली.

धाराशिव येथील तेर येथे 13 सप्टेंबरला रात्री मुसळधार पाऊस पडल्याने तेरणा नदीला पूर आलेला आहे. पवारवाडी येथील हिराबाई शिवराम काळे (वय 80) ही महीला श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी आली होती. या महीलेचा साडेपाचच्या दरम्यान चक्कर आल्याने पाय घसरून ती तेरणा नदीच्या भक्तीमार्ग पुलाजवळ वाहात्या पाण्यात पडली व ती झाडाला आडकली.ही घटना तेर येथील अविनाश आगाशे व हर्षद चौगुले यांना कळाल्यांवर अविनाश आगाशे व हर्षद चौगुले यांनी जिवाची पर्वा न करता तेरणा नदीच्या वाहत्या पाण्यात उडी टाकली व झाडाला अडकलेल्या महीलेला पाण्याच्या बाहेर काढून तेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


तेरमध्ये ढगफुटी

तेर व परिसरात 13 सप्टेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश्य 200 मिमी पाऊस पडल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले. तर पिके पूर्ण पाण्याखाली आली आले. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकाची पाहणी 14 सप्टेंबरला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तेरचे ग्राम मंडळ अधिकारी शरद पवार, तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते. तेर येथील माऊली ट्रेडसच्या दुकानात तळघरात ठेवलेले शंभर पोते सिमेंटचे नुकसान झाले अशी माहिती दुकानदार ज्ञानदेव कुंभार यांनी दिली.


 
Top