तेर (प्रतिनिधी-) धाराशिव तालुक्यातील तेर व परीसरात 13 सप्टेंबरला सायंकाळी 200 मिलीमिटर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले तर पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

धाराशिव तालुक्यातील तेर व परीसरात 13 सप्टेंबरला सायंकाळी सहा पासून रात्रभर 200 मिलीमीटर पाऊस पडल्याने तेरणा नदीचे पात्र भरभरून वाहत असून खरीप हंगामातील पिके मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले असून प्रपंच कसा भागवावा या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत.मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याने नागरीकांचे अतोनात हाल झाले.


 
Top