कळंब (प्रतिनिधी)- 1500 व्या पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान कळंब कडून सामाजिक बांधिलकी जपत यंदा तालुक्यातील रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन, लोकसहभागातून “ना नफा, ना तोटा“ या तत्वावर नाममात्र दरात रुग्णसेवेची नवी दिशा देणारी सर्व सामान्यांच्या सेवेत दि. 11 सप्टेंबर 2025 पासून नवीन ऍम्ब्युलन्स दयावान प्रतिष्ठान कळंब च्या वतीने संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला वतीने सुरू करण्यात येणार आहे.
दयावान प्रतिष्ठान कळंब यांनी मागील वर्षी 16 अनाथ मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिट करून केलेले कार्य समाजात आदर्श ठरले होते. तर दि. 4 सप्टेंबर रोजी नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ चौक येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष जावेद सौदागर, उपाध्यक्ष मकसूद शिकलगार, सचिव वसिम चौधरी, कोषाध्यक्ष इलियास कुरेशी, सहसचिव इम्रान मिर्झा यांनी केले आहे.
