धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे  डॉ. प्रतापसिंह पाटील व  करण प्रतापसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित डॉ. व्ही.के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियंता दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवीन प्रवेशीत विद्यार्थाचे  स्वागत करण्यात आले.  

प्रथम भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन  प्रमुख पाहुणे शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथील विभागप्रमुख प्रा. एल.एम. माने, प्रा.आर.जी.लगदिवे, कॅम्पसचे संचालक प्राचार्य डॉ. सूरज ननवरे आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. एल.एम.माने यांनी नवीन अभियंत्यांना कृषी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या नवनवीन संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले तर प्रा.आर.जी.लगदिवे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थाना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाये प्राचार्य अमरसिंह कवडे मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top