मुरूम (प्रतिनिधी)- जि. प. कन्या प्रशाला मुरूम शाळेत रोटरी क्लब मुरूम सिटी पदाधिकारी व मुरूम नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक रोटेरियन शरणाप्पा धुम्मा यांच्या मुलीचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि. प. कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक शेके हरी ग्यानबा हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रोटेरियन डॉ. नितीन डागा, रोटेरियन कलाप्पा पाटील, रोटेरियन बदोले, रोटेरियन शिवानंद स्वामी इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाढदिवस कार्यक्रमाच्या प्रस्ताविक पर मनोगतात रोटेरियन डॉ. नितीन डागा यांनी रोटरीच्या कार्यप्रणालीची माहिती देऊन ते तळागाळातील शेतकरी, पर्यावरण, शिक्षण,आरोग्य यासाठी सतत प्रयत्न करते. त्यासाठी नियमित वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून त्याचा लाभ गरजूना करून दिला जातो अशी माहिती दिली.
त्यानंतर कु.स्वरा शरणाप्पा धुम्मा वाढदिवस जि. प.कन्या प्रशाला व रोटरी सिटी क्लब मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शाल, फेटा, पुष्पहार घालून व केक कापून साजरा करण्यात आला.
स्वराच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना रोटे कल्लप्पा पाटील म्हणाले,“शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुरूम रोटरी सिटी क्लब कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली तर रोटेरियन शरणाप्पा धुम्मा यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पुस्तके देण्याच्या आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जाधव वंदना जयराम यांनी केले तर आभार श्रीमती कुलकर्णी रेणुका देवीदास यांनी मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी गायकवाड, महादेव कुनाळे, डॉ.जाधव वंदना, सोनाली कलशेट्टी ,कुलकर्णी रेणुका, बिना पोतदार, सविता साळुंखे अलका गायकवाड,लक्ष्मीकांत महामुनी, नरवटे अश्विनी,साधू गायकवाड,परिचर तात्या जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले.
