मुरूम (प्रतिनिधी)- बेरडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य व उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बदली झालेल्या शिक्षकांना भावपूर्ण निरोप देण्यात आला तर नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल मुडमे तसेच सहशिक्षक सुनिल राठोड, बालाजी भालेराव, युवराज चव्हाण व सहशिक्षिका रंजना तांदळे यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याने त्यांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला. त्यानंतर नव्याने रुजू झालेल्या खंडू वाकळे, कमलाकर सोमवंशी, गणपत राठोड, मोहन कांबळे व तनुजा कांबळे या शिक्षकांचे गावकऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष रंजितकुमार भोकले, उपसरपंच दशरथ मंडले, ग्रामसेवक निकम साहेब, कृषी सहाय्यक पाटील साहेब उपस्थित होते. तसेच शिवशंकर माळी, दत्ता कोळी, मल्लिनाथ कांबळे, चंद्राम मंडले, गोविंद व्यंकट मंडले, शिवशंकर मंडले, हणमंत भोकले, कल्लेश्वर मंडले, श्रीमती रंगुबाई वासुदेव, सपना मंडले, भाग्यश्री वासुदेव, ज्योती भोसले, भालचंद्र मंडले, कन्हैय्या भोकले, पांडुरंग वासुदेव, गोपाळ वासुदेव, रायप्पा शिवपाटील, निगन्ना वासुदेव, भीमाबाई मंडले, युवा प्रशिक्षणार्थी राधिका जमादार, धनराज वासुदेव,पंडित भोसले मु अ शेके सर आदींची उपस्थिती होती.
या सोहळ्यातून एकीकडे निरोपामुळे डोळ्यांत अश्रू तर दुसरीकडे स्वागतामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमुळे शाळेच्या इतिहासातील हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.सुत्रसंचालन मोहन कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन मु अ खंडू वाकळे यांनी केले