मुरूम  (प्रतिनिधी)- येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत लेझीम-डोलताशांच्या गजरात व फुलांची उधळण करत शाळेत नुकतेच रुजू झालेले श्री. संजीव भोसले सर व श्री. सुनिल राठोड सर यांचे दिमाखदार स्वागत-सत्कार करण्यात आले. या विशेष प्रसंगी संपूर्ण शाळा आनंदोत्सवाने निनादली.

याच वेळी तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचा मान वाढविणाऱ्या कु. आशीष सोनकांबळे हिचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करून तिचे अभिनंदन करण्यात आले.

'कल करे सो आज कर, आज करे सो अब , पलमे प्रलय होजयेगा बहुरी करेगा कब' म्हणत शाळेची गुणवत्ता आज ज्या परिस्थितीत आहे त्यापेक्षा वरच्या लेव्हल ला घेऊन जाऊ असे प्रतिपादन नूतन शिक्षक सुनिल राठोड यांनी केले.  या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजिज शेख, उपसरपंच जयपालसिंग राजपूत, माजी सरपंच अमोल पटवारी, तंटामुक्ती अध्यक्ष  शिवशंकर कणमुसे, उपाध्यक्ष बिरबलसिंग राजपूत, शा.व्य.स. सदस्य  बालाजी डिगोळे,  इंद्रजीत लोखंडे तसेच पालक वर्ग उपस्थित होते. या सोहळ्यातून शिक्षकांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना प्रेरणा व शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा लाभल्याचे समाधान सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.  सूत्रसंचालन भोसले बालाजी यांनी तर आभार अजीज शेख यांनी मानले.

 
Top