धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विज्ञान मंडळ उद्घाटनाचे औचित्य साधून एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

चर्चासत्रासाठी मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.सागर डेळेकर हे लाभले होते. यावेळी डॉ. डेळेकर म्हणाले की, विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नवप्रवर्तक म्हणून देखील विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की,विज्ञान विभागात उद्योजकता विकासाला देखील खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेणे गरजेचे आहे.

सदर चर्चासत्र विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी , नवप्रवर्तक आणि उद्योजकता विकास या विषयावर आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चासत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.बाबासाहेब मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. मंगेश भोसले यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.स्वाती शीलवंत यांनी केले तर आभार प्रा. अतुल देशमुख यांनी मानले.  सदर चर्चासत्राला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी ,प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top