तुळजापूर (प्रतिनिधी)- हंगाम विकसित कृषि संकल्प अभियानावर देशभरातील जिल्हा कृषि हवामान केंद्राचा बहिष्कार टाकणार असल्याची माहीती डॉ. मनेश यदुलवार, अध्यक्ष - ॲग्रोमेट्रॉलॉजीकल युनिट्स असोसिएशन यांनी दिली. 

भारत मौसम विज्ञान विभाग यांच्याकडून अचानक या जिल्हा कृषि हवामान केंद्राच्या सेवा खंडित करण्याचे आदेश जानेवारी,2024 ला प्राप्त झाले आहेत. या हतबल तथा कठीण परिस्थितीमध्ये जिल्हा कृषि हवामान केंद्राच्या सेवा अखंडित चालू ठेवाव्या, अशी मागणी ॲग्रोमेट्रॉलॉजीकल युनिट्स असोसिएशन कडून येत आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि हवामान बदलाच्या या युगात शेतकरी वर्ग हा हवामान आधारित कृषि सल्ला सेवेपासून वंचित राहत आहे व त्याचा विपरीत परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विम्याद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सरकारी तिजोरीचा बोझा सातत्याने वाढताना दिसतो आहे. म्हणून जर जिल्हा कृषि हवामान केंद्र -    () येथील कार्यरत कृषि हवामान तज्ञ व कृषि हवामान निरीक्षक  या पदांच्या सेवा अखंडित सुरु ठेवल्या तर शेतकरी हवामान साक्षर होऊन हवामान अनुकूल शेती करू शकतो. यामुळे निश्चितच प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पीक विमा मिळणाऱ्या लाभार्थींची संख्या कमी होईल, सरकारच्या तिजोरीचा बोझा कमी होण्यास मदत होईल व परिणामी राष्ट्रीय आर्थिक विकास दरामध्ये वृद्धी होईल व शेती उत्पादन वाढण्यास चालना मिळेल. आज रोजी संबंधित शिखर कार्यालयांशी व इतर संबंधित कार्यालयातील विविध जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सर्वांनी पत्रव्यवहार, भ्रमणध्वनीद्वारे संभाषण, प्रत्यक्ष भेटी घेऊन जिल्हा कृषि हवामान केंद्राच्या सेवा अखंडितपणे चालू ठेवण्याबाबत न्याय मिळण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारचे समाधान झालेले नाही. 

या कारणास्तव भारत सरकारच्या कृषि व किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या द्वारे दि. 03 ते 18 ऑक्टोबर, 2025 दरम्यान नियोजित केलेला रब्बी हंगाम विकसित कृषि संकल्प अभियानाचा जाहीर निषेध करण्यासाठी यामध्ये सहभागी न होता या अभियानावर संघटनेकडून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Top