धाराशिव (प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा 6 4 वा वर्धापन दिन तर गुरुवर्य के.टी. पाटील यांची 96 वी जयंती संस्थेच्या वतीने हातलाई मंगल कार्यालय येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गुरुवर्य के .टी . पाटील सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने केला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत केलेल्या कार्यांची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.यानंतर गुरुवर्य के .टी . पाटील यांच्या जीवनपटावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील विविध शाखेतील यशवंत - गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बागल, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, तन्वी भोसले , सुहानी धोत्रे, जितेंद्र वसावे यांचाही सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्त कर्मचारी प्रा. तानाजी हाजगुडे, प्रा. दीपक पुजारी, प्रा. ए.एच. गुत्ते, प्रा .एम.पी. काळे , के.वाय. गायकवाड ,क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे , शिवाजी धोंगडे, सिध्देश्वर कोळी, महादेव कोळी, महेश देशमुख , रामेश्वर देशमुख, नागनाथ गोरसे यांचा करण्यात आला.
तर धाराशिव व सोलापूर जिल्हयातील ग्रामीण भागात शिक्षण संस्थेचे काम करणारे आदर्श संस्थाचालक म्हणून संस्था प्रतिनिधी तानाजी शिनगारे , चंद्रकांत महाजन, अमोल मोरे, डॉ. सागर पतंगे, अरूण घोगरे, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. शेषेराव जावळे, मौलाना जफर अली खान, लईक अहमद शेख यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .
तसेच संस्थेच्या विविध शाखेतील आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार म्हणून आदर्श सेवक सुहास ताटे, वरिष्ठ लिपीक विश्वनाथ दहिफळे, आदर्श शिक्षक अरविंद भगत , के.टी. पाटील डी.फॉर्मसीचे उपप्राचार्य सुधीर पांगे , नर्सिगचे प्राचार्य गजानंद वाले , नूतन प्राथमिक विदया मंदिराचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, प्रेरणास्रोत मार्गदर्शक म्हणून शिवकुमार लगाडे यांचा सत्कार करण्यात आला .
मातृ -पितृ कृतज्ञता सोहळ्याअंतर्गत अतिशय गरिबीतून आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन उच्चविदयाविभूषित करून आपल्या पायावर उभे करणाऱ्या अशा आई- वडिलांचा सत्कार करण्यात आला तर जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा व इतर स्पर्धा मधील विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेची प्रगतीबाबत समाधान व कौतुक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह . भ .प . प्रकाश बोधले महाराज तर प्रमुख पाहुणे अरुण कदम होते. तर प्रमुख उपस्थिती दत्ता भाऊ कुलकर्णी, अमोल पाटोदेकर ,माजी प्राचार्य जयसिंगराव देशमुख, एम.डी . देशमुख , व्याख्याते प्रा . विशाल गरड, संजय पाटील दुधगावकर , देविदास पाठक , नितीन तावडे , धनंजय शिंगाडे , डॉ. शिवाजी शिंदे , खरात साहेब , श्रीकृष्ण भन्साळी होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह . भ.प . प्रकाश बोधले महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या संस्थेने आपली घौडदौड अशीच चालू राहावी , असा शुभा शिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा . विशाल गरड यांनी आपल्या व्याख्यानात मुलांच्या जडणघडणीत पालकांचा असलेली जबाबदारी व आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव मुलांमध्ये असायलाच हवा , असा विचार यावेळी व्यक्त केला. या समारंभाला संस्थेच्या सचिव प्रेमाताई पाटील , तुळजाभवानी बँकेचे अध्यक्ष संजय केशवराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , युवा नेते व उदयोजक अभिराम पाटील , डॉ . मंजुळाताई आदित्य पाटील , सर्व संस्था सदस्य तसेच विविध शाखेचे प्राचार्य तसेच श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम ,विभाग प्रमुख , पर्यवेक्षक , सर्व कर्मचारी वर्ग , विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस .सी . पाटील , प्रा . दत्तात्रय जाधव , श्रीमती जयमाला शिंदे यांनी केले तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी सर्वांचे आभार मानले व संगीत शिक्षक महेश पाटील यांच्या पसायनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.