धाराशिव (प्रतिनिधी)- भुम तालुक्यातील  पांढरेवाडी येथे पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे गावातील 45 कुटुंबातील सुमारे 250 नागरीकांना जिल्हा परीषद शाळा पांढरेवाडी येथे हालवण्यात आले आहे. नागरीकांना जेवन आरोग्य व इतर सोईसुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. या नागरीकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यांना प्रशासनाकडून तात्काळ मदत करणेबाबत जिल्हा प्रशासनास सुचना केल्या आहेत.

आंबी येथील गटकळ कुटुंबाचा पुराच्या पाण्याने संपुर्ण संसार उध्वस्त केला असून आयुष्यभराची मेहनत पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे. तसेच गटकळ कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील गंभीर असून या संदर्भात दिलासा देणे ही जबाबदारी असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.

जयवंतनगर, पाटसांगवी येथील अनेक घरांचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांचे तात्काळ पंचनामे करुन आर्थीक मदत प्रशासनाकडून देणेबाबत सुचना करण्यात आली.

आहिल्यानगर जिल्हयात मोठया प्रमाणात पाऊस झाला असल्या कारणाने सिना नदीमध्ये मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून सिना कोळेगाव धरण पुर्णत: भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग अत्यंत वेगाने करण्यात येत असून सिना नदी किनाऱ्यावरील भोत्रा आवारपिंपरी, देवगाव, वडनेर, कपीलापुरी, वाघेगव्हाण, लोहारा, शिराळा, नालगाव आदी भागातील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहणेबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व नागरीकांना अव्हान करण्यात आले.तसेच नागरीकांच्या पशुधनाची देखील काळजी घेणेबाबत सुचना दिल्या. सिनाकोळेगाव धरणातून 80-85 हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरु असून वाढ होण्याची शक्यता असून नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.    


 
Top