धाराशिव (प्रतिनिधी)-  ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 189 कोटी रूपयांचा शेती नुकसानीची अहवाल सरकारला सादर केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे व घराच्या पडझडीचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्यानुसार 189 कोटी रूपयांची मागणी सरकारकडे केली आहे. सप्टेंबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत वाढ झाली आहे. त्या नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगून जिल्हाधिकारी पुजार यांनी या संदर्भात तहसीलदार यांना सांगितले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावातील चावडीवर वाचून दाखविले जाणार आहे. त्यामुळे कोणीही सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. 


पत्र आले नाही

17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास निधी संदर्भात समज, गैरसमज संपल्यामुळे लवकरच विकास निधीवरील स्टे उठविण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना मिळेल असे सांगितले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी पुजार यांना विचारले असता विकास निधीवरील स्टे उठविल्याचे पत्र अद्याप आपल्याला मिळाले नसल्याचे सांगितले. 

 
Top