तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावणमास म्हणजेच सण-उत्सवांचा महिना, आणि यंदा महाराष्ट्रात 25 जुलैपासून ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंत श्रावणमास प्रारंभ झाला असुन, हा महिना हिंदू धर्मिय कुलधर्मकुलाचार पूजा अर्चा साठी पवित्र  मानला जात असल्याने या महिन्यात  विविध पूजा, व्रत, उत्सव यांची रेलचेल असते.

श्रावणतील  सण- 29 जुलै  नागपंचमी, 8 ऑगस्ट  नारळी पौर्णिमा, 9 ऑगस्ट  रक्षाबंधन, 15 ऑगस्ट  श्रीकृष्ण जन्माष्टमी, 16 ऑगस्ट  गोपाळकाळा, दहीहंडी, 19 ऑगस्ट, 22 ऑगस्ट  पोळा, प्रत्येक सोमवार श्रावणी सोमवार (महादेवाची विशेष पूजा, अभिषेक, उपवास) प्रत्येक मंगळवार  मंगळागौरीची पूजा (नवविवाहित महिलांसाठी खास)

श्रावणमासातील वैशिष्ट्ये- हा महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. म्हणूनच या महिन्यात शंभूमहादेवावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केले जातात. तुळजाभवानी, श्रीविठ्ठलरुकमीणी शंभू महादेव अंबाबाई ञिबंकेश्वर   अशा राज्यातील प्रमुख मंदिरे, तसेच शिवमंदिरे, याठिकाणी हिंदू भाविक दर्शनार्थ गर्दी करतात, महिलांसाठी मंगळागौर, नारळी पौर्णिमा, तर मुलांसाठी दहीहंडी आणि गोकुळाष्टमी उत्सवी उत्साहाने साजरी केली जाते.

सामाजिक आणि धार्मिक चित्र- प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असते. पारंपरिक व्रत, उत्सव, उपवास, मंगलकार्ये, स्त्रियांच्या मंगळागौरीसारख्या व्रतांची परंपरा या महिन्यात अत्यंत समृद्ध आहे. श्रद्धेने मंदिरांमध्ये दर्शन-जपनाम, अभिषेक, विशेष सामूहिक उपवास, नामस्मरण व भजनांची जय्यत तयारी सुरू आहे.

 
Top