तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडी या रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून (रु. 40 लक्ष) करण्यात आले आहे. परंतु सदरील रस्त्यावर एक वर्षातच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे गंजेवाडीला जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वाहनधारक त्रस्त आहेत.सदरील काम निकृष्ट झाले असल्याने रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.एक वर्षातच खड्डे पडत असतील तर या कामाची चौकशी करावी व संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी धाराशिव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्याकडेही लेखी मागणी केलेली आहे.