भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई  मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याची माहिती माजी मंत्री आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी दिली.

माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी भूम तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.  यावेळी त्यांच्याकडे अनेक शेतकरी बांधवांनी नुकसानी संदर्भात भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा केली.

यावेळी आमदार पाटिल यांचे भूम तालुका भाजप कार्यालयात राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, सुदाम पाटील, महादेव वडेकर, रघुनाथ वाघमोडे, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, शरद चोरमले, महिला तालुका अध्यक्ष स्वाती तनपुरे, शहर अध्यक्ष विद्या खामकर, सौलता गोरे एम.आय.डी.सी. भूम या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नवनाथ रोकडे, योगेश ज्ञानेश्वर असलकर, दिपक मोतीलाल आसलकर तर उळूप या ठिकाणी अंकुश करडे, ज्ञानेश्वर सानप, सुहास सानप यांनी त्यांचे स्वागत केले.

 
Top