धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. राष्ट्रीय गीताच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.यावेळी शाळेमधी परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आली.
गावातील दोन उज्वल तारकांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतीक पांडुरंग वीर, याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड सुकन्या सिद्धी सुरेश गायकवाड, हिची एम्स वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्री प्रमोद काका वीर, उपसरपंच श्री गाडे, शालेय व्यवस्थापन समिती अद्यक्ष श्रीमती संजीवनी पौळ ताई, उपाध्यक्ष श्रीमती अफसाना शेख, पोलीस पाटीप श्री प्रमोद माळी, तंटामिक्ती चे अद्यक्ष शामसुंदर लावंड, संतोष चौगुले, हरिदास म्हेत्रे, विजय माळकर, बाळासाहेब वीर, संजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, व देशप्रेम जागवणारी भाषणे सादर केली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, शिक्षणातील प्रगती आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत याबद्दल कौतुक व्यक्त केले. शेवटी मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या वेळी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच असंख्य नागरिक हजर होते.