धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. पक्षप्रमुख भाई एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी गावागावात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख साळुंके यांनी केले.

आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिकांची बैठक धाराशिव शहरातील शासकीय विश्रामृहात घेण्यात आली. यावेळी मतदार संघातील गट निहाय विभाग प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या. 

जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघातील गावागावात शिवसेना पक्षाचे संघटन मोठे आहे. हे संघटन वाढविण्यासाठी प्रत्येक गावात किमान दोनशेपेक्षा अधिक सदस्य नोंदणी अपेक्षित आहे. शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे यांच्या गाव तिथे शाखा आणि गाव तिथे शिवसैनिक या संकल्पनेला अधिक बळ देण्याकरिता नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात विभाग प्रमुखांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असे माहिती साळुंके यांनी दिली.


 
Top