धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथे सामाजिक न्याय भवन उभारण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा सारोळा गावचे माजी सरपंच प्रशांत रणदिवे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना निवेदन दिले. सारोळा बुद्रुकसह परिसरातील नागरिकांना विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सामाजिक न्याय भवनाची नितांत आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य व उपक्रम राबविण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.