धाराशिव (प्रतिनिधी)-  अखेर खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी लोकसभा व विधानसभा या दोन्ही ठिकाणी ऑनलाइन गेम बंदी बाबत जोरदार मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. केंद्र सरकारने ऑनलाइन गेम बंदीचे बील पास केला आहे. 

तंत्रज्ञानामुळे व्यक्तींचे जिवन सुसाहय होत असताना तरुण पिढीच्या हातात मोबाईल आला मोबाईल सोबतच त्याची काळी बाजू असणाऱ्या अनेक गोष्टी आल्या. यामुळे तरुण पिढी वाईट अशा ऑनलाईनवर उपलब्ध असणाऱ्या विविध गेमच्या आहारी जावून नैराश्यात आत्महत्यासारख्या पाऊल उचलू लागला. आई वडीलांनी व कुटुंबियांनी लहानाचा मोठा केलेला घर संभाळणारा व्यक्ती जंगली रमी, ड्रीम -11, रमी सर्कल, ऑनलाईन तीन पत्ती, ऑनलाईन पोकर, लकी चिकन रोड, चक्री यासारख्या ऑनलाईन गेमच्या फसव्या जाहीरातीस भूलून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्ने पाहू लागला. यातच आपण नकळत ऑनलाईन गेमच्या मोहजाळात आडकत गेलो आहे. हे लक्षात आल्यानंतर डोक्यावर प्रचंड कर्ज झाल्याची जाणीव त्यास आत्महत्याकडे घेवून जात आहे.

दि. 16/06/2025 रोजी धाराशिव जिल्हयातील बावी कावलदरा येथील तरुण लक्ष्मण जाधव याने या ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे झालेल्या कर्जाच्या नैराश्यातून स्वत:चे कुटुंब विष देवून संपविले व स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली होती. या आगोदर कुर्डुवाडी येथील तरुणाने अशाच पध्दतीच्या गेमच्या व्यसनापायी 8 एकर जमीन व दोन ट्रॅक्टर विकल्याची घटना घडली होती. ही दोन प्रातीनिधीक उदाहरणे असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभरात ऑनलाईन जुगाराच्या मोहातून अनेक तरुणांनी जिवन संपविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी लोकसभा व विधानसभेत ऑनलाईन गेम बंदीची मागणी केली होती. 


 
Top