धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामकाजावरून पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांच्या भावनांचा विचार करण्याची व नागरिकात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरिता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जनसुनावणी घ्यावी. अशी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केली आहे.

यापूर्वीच्या आमदारांनी तुळजापूर विकास प्राधिकरण सुरू करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. यात्रेसाठी अनुदान मिळवून दिल्याचे श्रेयही त्यांनाच जाते. मात्र, तुळजाभवानी मंदिराचे उत्पन्न नाही विद्यमान आमदारांनी मात्र हे पाऊल उचलून विकास आराखड्यास चालना दिल्याचे स्पष्ट दिसते.असा उपरोधिक टोला हे यावेळी खासदार ओमराजे यांनी यावेळी लगावला. श्री क्षेत्र तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ असून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असून कुलस्वामिनी तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्याने तुळजाभवानी मंदिराच्या जिर्णोद्धारास विरोध नसल्याचेही स्पष्ट केले. पालकमंत्री पद व खासदार पद हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे त्यांना शेलार यांनी बैठकीला बोलाविणे आश्वयकच आहे. 

दरम्यान, राणा पाटील यांनी “तुळजापूरची बदनामी महायुतीने की महाविकास आघाडीने केली“ असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावरून त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठकीची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीच्या पत्रकात पालकमंत्री व खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु नंतर सुधारित पत्र काढून त्यांना दूर ठेवण्यात आले.

या सर्व घडामोडींमध्ये तुळजापूर शहरातील नागरिक, व्यापारी व पुजारी समाज संभ्रमित झाले आहेत. विकास आराखडा त्यांच्या हितासाठी आहे की राजकीय स्वार्थासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या संभ्रमाचा निकाल लावण्यासाठी तुळजापूर येथे जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे. यावेळी आमदार कैलास पाटील, ऋषी मगर, राजाभाऊ शेरखाने, महेबुब पटेल, सुधीर कदम याच्या सह पत्रकार बांधव उपस्थित होते. 

 
Top