मुरुम( प्रतिनीधी )- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तीन दोन विद्यार्थी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ठाणे येथे दि.29/08/2025 रोजी ठाणे येथील खासदार श्रीकांत शिंदे व भारताचा फिरकी पटू हरभजन सिंग यांच्या हस्ते इयत्ता 12 वर्गातील आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. व तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील इयत्ता 12 वर्गातील साक्षी अजय वेदपाठक, क्रतीका गोपाल इंगोले, साक्षी संजय बेंडकाळे, प्रणाली नेताजी चौधरी, सलोनी बिराप्पा बंदीछोडे, या विद्यार्थिनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बसवराज पाटील साहेब, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष श्री बापूरावजी पाटील साहेब व उमरगा जनता बँक चेअरमन व संचालक शरण बसवराज पाटील, व संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले यांच्यासह प्राचार्य उल्हास घुरघुरे पर्यवेक्षक विवेकानंद पळसाळगे ज्येष्ठ शिक्षक संजय गिरी सर उमाकांत महामुनी सर आधीसह यांनी अभिनंदन केले. यांना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक सुजित शेळके व नारायण सोलंकर यांची लाभले.