मुरुम( प्रतिनीधी )- भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे राष्ट्रीय राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने राष्ट्रीय खेळ दिन साजरा करण्यात आला . दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी देशाचा महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 ची थीम 'शांततापूर्ण आणि समावेशक समाजांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ' ही होय.

या  कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे डॉ गिरिधर सोमवंशी प्रमुख वक्ते एनसीसीचे कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले होते यांनी आपल्या भाषणात या दिवसाचे महत्त्व सांगुन मेजर ध्यानचंद यांच्या हॉकिच्या खेळाचा संपूर्ण इतिहास सांगून त्यांना 'हॉकीचा जादूगार ' म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. ते भारतीय हॉकी खेळातील एक महान खेळाडू होते आणि त्यांच्या उत्कृष्ट कौशल्य, आक्रमकता, निपुणता आणि खेळातील योगदानामुळे त्यांना हा सन्मान दिला गेला. त्यांच्या जन्मदिनाच्या दिनी 29 ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो .ऑलिंपिक हॉकीपटू मेजर ध्यानचंद स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध झाले.

दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात या खेळावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय हॉकीपटु ध्यानचंद यांनी  उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला ऑलिंपिक सलग तीन वेळा सुवर्णपदकांची पहिली हॅटट्रिक पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतीय सैन्याच्या रेजिमेंटल संघातून हॉकी कारकिर्दीला सुरुवात केली .ध्यानचंद हा एक प्रतिभाशाली , मेहनती , खेळाडुवृत्ती असा गुणवान खेळाडु होता .ध्यानसिंग रात्री चांदण्याखाली हॉकीचा सराव करत असे, त्यामुळेच त्यांना ध्यानचंद हिंदीत चांद म्हणजे चंद्र हे नाव देण्यात आले . त्यांच्या जादुई हॉकीमुळे आणि खेळाच्या आक्रमकतेमुळे हॉकीच्या जगावर त्यांने अधिराज्य केले ज्यामुळे त्यांना 'हॉकी विझार्ड' असे नाव देण्यात आले. त्यांच्या कारकीर्द मध्ये 185 सामन्यात 400 हून अधिक गोल केले . सर्वकालीन महान हॉकी खेळाडूंपैकी एक ते होते .भारत सरकारने त्यांना पद्मभूषण  सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला. सरांनी ध्यानचंदचा आदर्श घेऊन यापुढे होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळात भारताला अव्वल स्थान मिळवून दयावे असे भाषणात सांगितले . या कार्यक्रमासाठी क्रिडा विभागाचे प्रा विजय पवार , डॉ राजु सुर्यवंशी प्रा गोविंद गायकवाड, डॉ अनिल देशमुख   प्राध्यापक, प्राध्यापिका,एनसीसी कॅडेटस , विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट सिद्धु झांपले तसेच सुत्रसंचलन प्रमोद शुनगार व आभार कॅडेट प्रेमनाथ जमादार यांनी केले .

 
Top