तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुरतगाव येथील गैरहजर राहणाऱ्या तलाट्यावर निलंबन कारवाई करण्याची मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब घोडके यांनी तहसिलदारांना निवेदन देवुन केली.
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे मागील तीन वर्षा पासुन सज्जा काम आहेत. माञ आठवड्यातीन एक किंवा दोन तासासाठी येतात. ते सज्जावर राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचे कामे वेळेवर होत नाहीत. गावकऱ्यांना अनेक कामे सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. सरळ म्हणतात कागदपत्रे महाईसेवा केंद्रातुन घ्या व सही शिक्का माझ्या कडुन घ्या. कार्यालयात काँम्प्युटर,प्रिंटर लाईट उपलब्ध नाही. याबाबत भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा धाराशिवचे दादासाहेब घोडकेंनी तहसिलदार तुळजापूर यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत यांनी ही पञ दिले आहे.