भूम (प्रतिनिधी)- येथील शंकराव पाटील महाविद्यालयात 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव दिनाचे आयोजन महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी आदिवासी समाजाकरिता मोलाचे बलिदान दिले अशा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. 

यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे तालुका कृषी अधिकारी, वाशी येथे कार्यरत असणारे राजाराम धनाजी बर्वे सर यांचा स्वागत आणि सत्कार महाविद्यालय मार्फत विद्या विकास मंडळ पाथरूड संस्थेचे उपसचिव आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शिंदे एस.एस. सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी उपस्थिती दर्शवली ते म्हणजे डॉ. शिंदे एस. एस. सरयांचे देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार महाविद्यालय मार्फत करण्यात आले. या रानभाजी महोत्सव दिनाचे अध्यक्ष स्थान ज्यांनी स्वीकारले  ते म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम यांचा देखील महाविद्यालय मार्फत स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्याच्यासोबत मंचावर उपस्थित असणारे महाविद्यालयीन आय. क्यू. ए.सी. कॉर्डिनेटर डॉ. सुरवसे जी.एच. सर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख गायकवाड आर.एस. सर, ज्येष्ठ प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बोराडे सर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. गव्हाणे सर यांचे देखील या ठिकाणी महाविद्यालय मार्फत स्वागत आणि सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात यानंतर गायकवाड आर.एस. यांनी या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक देऊन केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बर्वे सर यांनी रानभाज्या बद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना केले रानभाज्या या आजच्या काळामध्ये नष्ट होत चालले आहेत पण तरी देखील त्या अशा भाज्या आहे की ज्या रानात कोणत्याही प्रकारच्या खतांचा वापर न करता कुठलाही पद्धतीच्या सिंचन व्यवस्था न देता उगवणाऱ्या आहेत व त्यांच्यामध्ये खूप जास्त औषधी गुणधर्म आहेत ज्या आपण वेळोवेळी खायला पाहिजेत त्यांचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त आहे हे उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे भूम येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचे शिक्षक राऊत सर आणि घुले सर हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन या रानभाज्या महोत्सव दिनांमध्ये उपस्थित होते त्याचबरोबर राणी ताराराजा हायस्कूलचे वुनावणे सर हे देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी फार मोठ्या प्रमाणात मिळाला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदाळे मॅडम यांनी देखील आपल्या अध्यक्षही समारोपामध्ये या कार्यक्रमाचे भरपूर मोठ्या प्रमाणात कौतुक केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देखील महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अलगुंडे एस. एम. यांनी केले तर आभार प्रदर्शन हे डॉ. खराटे एम.एस. सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोल  मदत केली. डॉ. पडवळ सर, तिजारे सर, दुनघव सर, खंदारे सर, कुटे सर, मसराम सर, माळी सर , भोंग सर, राठोड सर, कराळे सर, डोंगरदिवे सर, जगदाळे सर, आगे सर, तावरे मॅडम, सुतार मॅडम, गिरी मॅडम, आवटे मॅडम, अंभोरे मॅडम, मोरे मॅडम, बारकुल सर या महाविद्यालयीन सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

या उपक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची सर्व माहिती, भाज्या करण्याची पद्धती या विद्यार्थ्यांना विचारून त्याची जाणीव आणि माहिती करून घेतली. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्या तयार रानभाज्या स्वतः रानात रानात जाऊन जमा करून त्याचा प्रदर्शन या उपक्रमामध्ये केलं. वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख गायकवाड, डॉ.अलगुंडे मॅडम आणि डॉ. खराटे यांचा देखील स्वागत आणि सत्कार यावेळेस महाविद्यालयामार्फत करण्यात आले.


 
Top