धाराशिव (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाने जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.धाराशिव कामगार विभाग जिल्हाध्यक्षपदी संतोष धावारे, धाराशिव अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्षपदी दालुज अली, तर कामगार विभाग तालुकाध्यक्ष पदी अक्षय झोंबाडे यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाध्यक्ष राज धज यांनी मंगळवारी दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी धाराशिव येथील पक्ष कार्यालयात नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष नंदा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय युवक अध्यक्ष कनिष्क कांबळे मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आरपीआय (डेमोक्रॅटिक) पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबुतीकडे वाटचाल करत असून, नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून पक्ष विस्तार करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राज धज यांनी यावेळी केले.यावेळी युवक अध्यक्ष अनिल वाघमारे, अमोल पेठे, अजय माने, कौतुक माने, अक्षय कांबळे यावेळी उपस्थित होते.