धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शासकीय बालचित्रकला स्पर्धा 2025 उत्साहात 12 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. इयत्ता 5 वी ते 7 वी तिसऱ्या गटात माझा आवडता सण, शाळेच्या मधल्या सुट्टी गप्पा मारणारे मुले / मुली, भाजी बाजार या तीन विषयापैकी एका विषयावर विद्यार्थ्यांनी उत्साहात चित्र रेखाटून रंगविले. या स्पर्धेचे आयोजन कलाविभाग प्रमुख शिवाजी भोसले यांनी केले. कलाध्यापक धनंजय देशमुख, शेषनाथ वाघ यांनी स्पर्धा आयोजनात परिश्रम घेतले . स्पर्धे स्थळी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे इ.7वीचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव उपस्थित होते. उपमुख्याध्यापक प्रमोद कदम इयत्ता 5 वी 6वी चे पर्यवेक्षक बालाजी गोरे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


 
Top