भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील भवनवाडी (सुकटा) येथील युवकाला दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता पैसे परत करण्याच्या कारणावरून तीन आरोपींनी मारहाण केल्यामुळे व युवकाला धाराशिव येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता प्रकृती चिंताजनक होऊन युवकाचे मृत्यू झाला.
अधिक माहितीनुसार अशी की भूम तालुक्यातील मयत बालाजी जयराम भायगुडे वय (36) या युवकाला जोशी बबरू काळे, राधा जोशी काळे, तुषार जोशी काळे, हे सर्व आरोपी राहणार सुकटा हे सर्व भाई गुडे यांच्या घरी जाऊन व्याजाने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून आरोपी जोशी काळे फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे पती बालाजी जयराम धायगुडे यांना घरातून बाहेर नेऊन आरोपींनी हाताने पोटात व छातीत मारहाण केली. आरोपी जोशी काळे यांनी फिर्यादीच्या पतीचे डोके सिमेंट रोडवर आदळे व दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचाराकरिता दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मग त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे करत आहेत.