तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील समर्थ पतसंस्थेचे चेअरमन, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नारायण ननवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या सह्या असलेले नियुक्तीपत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ननवरे यांना देण्यात आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवणे आणि विजय मिळवून देणे हा भाजपचा उद्देश असल्याचे नेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर ही नियुक्ती जाहीर झाली आहे.

 
Top