तुळजापूर (प्रतिनिधी)-   तालुक्यासाठी जलवरदायिनी मानल्या जाणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने तिर्थक्षेत्र तुळजापूर, नळदुर्ग या शहरांचा वा अणदूर चिंकुद्रा मुर्टा या ग्रामपंचायत सह श्रीतुळजाभवानी साखर कारखाना सह अनेक गावाचा शेती पाणीपुरवठा प्रश्न मिटला आहे. या  धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढील दोन वर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

गुरुवार, 14 ऑगस्ट रोजी पहाटेपासून धरण सांडव्यावरून पाणी वाहू लागले. बोरी प्रकल्प भरल्याने यातील काही पाणी अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर प्रकल्पातही जाईल. या प्रकल्पाचा एकूण साठा 35.26 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त जिवंत साठा 32.27 दशलक्ष घनमीटर आहे. तुळजापूर, नळदुर्ग या दोन नगरपरिषदांसह अणदूर, चिकुंद्रा, मुर्टा व कारखान्यास मिळून सुमारे 4 दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा याच प्रकल्पातून केला जातो.

 
Top