तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड कार्यक्रमास संघटनेचे जेष्ठ सदस्य शिवाजीराव वाघ, लोकशाही पद्धतीने रामदास जगताप यांचे नाव सुचवले व त्यास सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी प्रतिसाद देत त्यांची बिनविरोध निवड केली. याप्रसंगी संघटनेचे जेष्ठ सदस्य संगीता होळकर मॅडम, अशोक कट्टे, जयप्रकाश हिरोळे, वैशालीताई माळी आदी मान्यवर उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवड प्रक्रियेत उत्साहाचे वातावरण होते.